सायन-कुर्ला दरम्यान रुळाला तडे गेल्यानं म.रे पुन्हा विस्कळीत

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं गेल्या आठवड्यात दिव्याजवळ झालेल्या आंदोलनाची घटना ताजी असतानाही मध्य रेल्वेचं रडगाणं अद्याप कायम आहेच. सायन-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. 

Updated: Jan 7, 2015, 09:04 AM IST
सायन-कुर्ला दरम्यान रुळाला तडे गेल्यानं म.रे पुन्हा विस्कळीत title=

मुंबई: रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं गेल्या आठवड्यात दिव्याजवळ झालेल्या आंदोलनाची घटना ताजी असतानाही मध्य रेल्वेचं रडगाणं अद्याप कायम आहेच. सायन-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. 

या घटनेमुळं मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. सकाळी सकाळी झालेल्या या खोळंब्यामुळं चाकरमान्यांना मात्र नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. 

दरम्यान, रेल्वे रूळाला गेलेला तडा दुरुस्त करण्यात आलाय. मात्र तरीही वाहतूक सुरळीत होण्यास काहीसा उशीर लागणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.