बाप्पाचे चक्क आता सिक्स पॅक अॅब!

Last Updated: Wednesday, September 3, 2014 - 22:19
बाप्पाचे चक्क आता सिक्स पॅक अॅब!

मुंबई: तुंदिलतनू गणपती बाप्पानंही आता चक्क सिक्स पॅक अॅब बनवलेत. अंधेरी येथील एका मंडळानं यंदा सिक्स पॅक अॅब असलेला गणपती बसवलाय. केवळ गणपतीच नव्हे, तर गणपतीची पूजाअर्चा करणारा इथला पुजारीही सिक्स पॅक अॅबवाला आहे. 

मुंबईकर नागरिकांमध्ये निरोगी आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मंडळानं यंदा ही कल्पकता वापरलीय. गणेशाचं दर्शन घेण्याआधी इथं भाविकांना वजनकाट्यावर उभं राहून, आपलं वजन किती वाढलंय, तेही कळतं... विशेष म्हणजे या बाप्पाला मोदक, पेढे आणि लाडवाचा नैवेद्य दाखवता येणार नाहीय. 

भक्तांना जर काही दान करायचंच असेल तर कॅलरी दान करा, असं आवाहन मंडळानं केलंय. त्यासाठी गणपती मंडपात चक्क ट्रेड मिलची सोयही करण्यात आलीय.

!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, September 3, 2014 - 22:17
comments powered by Disqus