गोरेगावमध्ये दुकानाचा स्लॅब कोसळून 2 ठार, 6 जखमी

गोरेगाव येथील प्रसाद शॉपिंग सेंटरमधील दुकानाचा स्लॅब कोसळल्यामुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर सहा जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Updated: Jul 16, 2014, 07:44 AM IST
गोरेगावमध्ये दुकानाचा स्लॅब कोसळून 2 ठार, 6 जखमी title=

मुंबई : गोरेगाव येथील प्रसाद शॉपिंग सेंटरमधील दुकानाचा स्लॅब कोसळल्यामुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर सहा जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

गोरेगाव स्टेशन मार्गावरील काकानगर येथे प्रसाद शॉपिंग सेंटर आहे. दुकाचा स्लॅब कोसळल्याने काही जण या ढिगाऱ्यात अडकले होते. ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरा सुरु होते. ढिगाऱ्यात अडकलेल्या काहींना बाहेर काढण्यात आले. मात्र, आणखी काहीजण अडकल्याची  भीती व्यक्त होत आहे.

पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी ढिगारा उपसण्याचे काम करीत होते.  या अपघातात जखमी झालेल्यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात नासील (30) आणि परशुराम यादव (16) या दोंघाचा मृत्यू झाला. तर सहा जखमींची ओळख पटविण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.