गिरगावात इमारतीचा भाग कोसळला

गिरगावातील भटवाडी भागात एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.

Updated: Jul 30, 2016, 11:07 AM IST
गिरगावात इमारतीचा भाग कोसळला title=

मुंबई : गिरगावातील भटवाडी भागात एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.

पाठारे हाऊस असं या इमारतीचं नाव आहे.. इमारतीच्या या कोसळलेल्या भागाखाली तिघेजणं अडकले होते.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या चार गाड्या आणि तीन रुग्णवाहिका तातडीनं घटास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर या दुर्घटनेत अडकलेल्या तिघांची अग्निशमन दालाच्या जवानांनी सुखरुप सुटका केलीये.