‘एसएससी’ सेंटर मुंबईतच, झी 24 तासचा दणका!

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘एसएससी’च्या परीक्षेचं सेंटर आता मुंबईतच असणार आहे. ‘झी २४ तास’च्या दणक्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Oct 11, 2014, 07:22 PM IST
‘एसएससी’ सेंटर मुंबईतच, झी 24 तासचा दणका!  title=

मुंबई : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अर्थात ‘एसएससी’च्या परीक्षेचं सेंटर आता मुंबईतच असणार आहे. ‘झी २४ तास’च्या दणक्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. 

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या लवकरच होणाऱ्या परीक्षेसाठी मुंबईतल्या परीक्षार्थींना चंद्रपूर सेंटर तर पुण्यातल्या परीक्षार्थींना गोवा सेंटर देण्यात आलं होतं... त्यामुळे अनेक परीक्षार्थींना ही परीक्षा देणं शक्य होणार नव्हतं... ही परीक्षा देऊ इच्छिणारे तरुण परीक्षा देण्याआधीच आपलं सेंटर पाहुणच हैराण झाले होते. 

हा मुद्दा 'झी 24 तास'नं उचलून धरला... आणि प्रशासनाला या वृत्ताची दखल घ्यावी लागली.

आता मुंबईकल्या परीक्षार्थींसाठीचं हे सेंटर मुंबईतच असणार आहे. झी २४ तासच्या दणक्यानंतर अनेक परीक्षार्थींना न्याय मिळालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.