शुभदामधील गाळ्यांचं गौडबंगाल

By Jaywant Patil | Last Updated: Saturday, May 4, 2013 - 23:40

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अनधिकृत बांधकामांशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झी मीडियाकडे केला आहे. शुभदा बिल्डिंगमधील गाळ्यांशीही आपला संबंध नसल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुखदा-शुभदा सोसायटीत एकही गाळा नसल्याचा दावा केला होता. मात्र अजित पवाराचे चार गाळे असल्याच उघड झालं आहे. हे चार गाळे अजित पवारांच्या नावानं १९ जानेवारी २००४ पासून नावावर असल्याच शुभदाच्या कागदपत्रांतून सिध्द झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या नावे २६ नंबरचा गाळा आहे. फायर पॉवर कंपनीच्या नावे २७ आणि २८ नंबरचे गाळे आहेत.

शुभदा सोसायटीतील नेत्यांच्या गाळयांचं गौंडबंगाल आरटीआय कार्यकर्त्यांनी उघड केलयं. सुखदा -शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील बेकायदा बांधकाम त्वरीत हटवावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुंबई महापालिकेने अजित पवार,पंतगराव कदम,शिवराज-पाटील चांकुरकर,गोपीनाथ मुंडे,माणिकराव ठाकरे नेत्यांना जारी केल्या होत्या. अजित पवारांच्या चार गाळ्यांची माहीती आरटीआय कार्यकर्ते अमित मारू यांनी उघड केलीये. 2004 पासून हे फ्लॅट अजित पवारांच्या नावावर असून 1 कोटी 30 हजार रुपये इतकी त्याची किंमत आहे.

First Published: Saturday, May 4, 2013 - 23:40
comments powered by Disqus