राज्य सरकारकडून कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या

गुजरातच्या अमूलपाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईत लॉन्च होतोय. भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो,अशी जाहिरात केली जाते. 

Updated: Oct 19, 2016, 12:18 PM IST
राज्य सरकारकडून कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या title=

मुंबई : गुजरातच्या अमूलपाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईत लॉन्च होतोय. भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो,अशी जाहिरात केली जाते. 

मुंबईत आरेची अवस्था खराब असताना राज्य सरकारच्या कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या घातल्या जातायत. विशेष म्हणजे नंदिनीच्या लाँच कार्यक्रमात खुद्द पदुम मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. 

राज्यात आणि मुंबईत सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट असताना इतर राज्यातील ब्रॅण्डसाठी राज्य सरकार पायघड्या घालत असल्याचं बोललं जातंय. 

खासगी दूधउत्पादकांची स्पर्धा पाहता राज्यातील गोकूळ, वारणा, विकास, कात्रज यांच्यासह महानंदसारख्या संस्थेच्या मदतीने दुधाचा एकच ब्रॅन्ड विकसित करण्यात येणार आहे, असं स्वतः पदुम मंत्री सांगत होते, असं असताना आता कर्नाटकच्या नंदीनी ब्रांड साठी मंत्रीचं त्या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.