स्टिंग ऑपरेशन : हे पाहिल्यानंतर तुम्ही चायनीज खाणं बंद कराल!

चायनिज खाद्यपदार्थ आता भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. चायनिज खाद्यपदार्थाच्या जोडीला विविध सॉस आपण आवडीन खातो पण चायनिजमध्ये वापरले जाणारे हे सॉस कसे जीवघेणे ठरू शकतात, 

Updated: Aug 22, 2014, 04:53 PM IST
स्टिंग ऑपरेशन : हे पाहिल्यानंतर तुम्ही चायनीज खाणं बंद कराल! title=

मुंबई : चायनिज खाद्यपदार्थ आता भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. चायनिज खाद्यपदार्थाच्या जोडीला विविध सॉस आपण आवडीन खातो पण चायनिजमध्ये वापरले जाणारे हे सॉस कसे जीवघेणे ठरू शकतात, याचं ‘झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीला आलेलं हे धक्कादायक वास्तव...  

मोठ्या आवडीनं आपण चायनीज खातो... पण हे चायनीज खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं... चायनीजमध्ये वापरले जाणारे सॉस अत्यंत घाणेरड्या जागेत, भेसळ करून बनवले जातात. मुंबईच्या चेंबूर भागातल्या पी.एल.लोखंडे मार्गावरच्या एका अनधिकृत आणि अत्यंत घाणेरड्या जागेत अनधिकृत कारखान्यात हे सॉस बनवले जातात. 

एफडीए, पोलीस आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून... फस्ट आणि सेंकड क्वालिटी आपल्याकडे उपलब्ध असल्याचं या कारखान्याच्या मालकानं ‘झी मीडिया’च्या प्रतिनिधीला सांगितलं.  

या सगळ्या भेसळयुक्त चायनीज सॉसमुळे शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असं डॉ. गौरी चव्हाण यांनी म्हटलंय. 

तेव्हा, यापुढं चायनीज किंवा रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाताना ते नक्की कुठे बनवले जातात, याची खात्री आधी करून घ्या... 

पाहा संपूर्ण स्टिंग ऑपरेशन - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.