ब्रिटिश लेखक विल्यम ठाकरेंचं, ठाकरे घराण्याशी नातं काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आडनावाचं स्पेलिंग thackeray असं का येतं. अगदी गुगल, यू-ट्यूबवर ठाकरे घराण्याची आडनावं याचं नावाने सर्च होतात, स्पेल चेकही हेच स्पेलिंग बरोबर असल्याचं सांगतं. तेव्हा ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग असं का?.

Updated: Mar 1, 2015, 02:14 PM IST
ब्रिटिश लेखक विल्यम ठाकरेंचं, ठाकरे घराण्याशी नातं काय? title=

मुंबई : ब्रिटिश कादंबरीकार विल्यम ठॅकरे यांच्याशी ठाकरे घराण्याचं काय नातं आहे, ते कसं जोडलं गेलं आहे, हे राज ठाकरे यांनी गोरेगावच्या जाहीर सभेत सांगितलं, हे नातं ठाकरे आडनावाच्या स्पेलिंगने जपलं जात असल्याचं दिसून येतंय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आडनावाचं स्पेलिंग thackeray असं का येतं. अगदी गुगल, यू-ट्यूबवर ठाकरे घराण्याची आडनावं याचं नावाने सर्च होतात, स्पेल चेकही हेच स्पेलिंग बरोबर असल्याचं सांगतं. तेव्हा ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग असं का?.

गुगल कसं ओळखतं ठाकरेचं योग्य स्पेलिंग?
दुसरा प्रश्न असाही आहे की, गुगल ठाकरेंना एवढ्या जवळून ओळखतं का? की या आडनावाचं स्पेलचेक येत, कारण अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या आडनावाचं स्पेलचेक गुगलवर येत नाहीत. स्पेलचेक म्हणजे गुगल आपल्याकडील योग्य ते स्पेलिंग लगेच चेक करून आपल्याला दर्शवतं.

राज ठाकरेंनी सांगितला संदर्भ
हे आपल्यासाठी असलेलं गुपित राज ठाकरे यांनी गोरेगावच्या जाहीर सभेत बोलतांना उघड केलं. राज ठाकरेंना थेट संपर्कासाठी कार्यकर्त्यांना आपला ई-मेल आयडी द्यायचा होता, हा ई-मेल आयडी योग्य तक्रारींसाठी असणार आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी connectrajthackeray@gmail.com असा मेल आयडी दिला. सोबत ठाकरेचं स्पेलिंगही सांगितलं. ठाकरे स्पेलिंग हे Thackeray असंच आहे, असं राज यांनी सांगितलं.

कारण आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ब्रिटिश लेखक विल्यम ठॅकरे हे अत्यंत आवडते लेखक होते, आणि आजोबांनी Thackeray हे स्पेलिंग तेथून उचललं, असं राज यांनी सांगितलं, आता दिग्विजय सिंह ठाकरे हे ब्रिटनमधील होते का? असा सवालही करू शकतात असं राज ठाकरेंनी मिश्किलपणे सांगितलं.

प्रबोधनकार ठाकरे यांनी आपले अत्यंत आवडते साहित्यिक विल्यम ठॅकरे यांच्याशी जपलेलं हे अनोखं नातं, पुढील सर्वच ठाकरेही जपतायत हे विशेष.

आपल्याकडे ई-मेलने योग्य त्या गोष्टी पाठवाव्यात, उगाच हाय, जय महाराष्ट्र लिहून पाठवू नये, अशा गोष्टींना मी उत्तरं देत नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.