ईश्वरीचिठ्ठी विरोधात बागलकरांची कोर्टात धाव

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा लॉटरी पद्धतीने झालेला पराभव हा अजूनही त्यांना मान्य नसून त्यांनी आता पुन्हा मतमोजणीसाठी न्यायालयात धाव घेतलीये. 

Updated: Mar 2, 2017, 10:37 PM IST
ईश्वरीचिठ्ठी विरोधात बागलकरांची कोर्टात धाव  title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा लॉटरी पद्धतीने झालेला पराभव हा अजूनही त्यांना मान्य नसून त्यांनी आता पुन्हा मतमोजणीसाठी न्यायालयात धाव घेतलीये. 

टेंडर वोटजी आहेत त्यांची मोजणी केल्यास विजय हा आमचाच आहे त्यामुळे टेंडर वोट मोजणीचे आदेश द्यावेत अशी याचिका सुरेंद्र बागलकर यांनी मुंबईतील लघुवाद न्यायालयात दाखल केलीये. यात त्यांनी निवडणुक अधिकारी, अतुल शहा आणि इतर उमेदवारांना प्रतिवादी बनवलय. 

आज साधारण दुपारी १२ च्या सुमारास मुंबईतील लघुवाद न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आलाय. यामुळे आता न्यायालय बागलकर यांची याचिका फेटाळून लावणार की त्यावर सुनावणी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे अतुल शहा आणि सेनेचे सुरेंद्र बागलकर यांना समसमान मते मिळाली होती. त्यानंतर लॉटरी पद्धतीने अतुल शहा यांची निवड करण्यात आली. पण ही लॉटरी पद्धत आपल्याला मान्य नसून टेंडर वोटची नीट मोजणी केली असता योग्य तो निकाल समोर येईल असा दावा सुरेंद्र बागलकर यांनी केलाय.