फटाके उडवतांना घ्या ही काळजी!

दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

Updated: Nov 11, 2015, 12:07 PM IST
फटाके उडवतांना घ्या ही काळजी! title=

मुंबई: दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

आणखी वाचा - मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!

फटाके उडवितांना ही काळजी घ्या - 

# फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा.
# फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.
# गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेलं असतं. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.
# विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा.
# मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आसमंत उजळून टाकणारे फटाके वापरा.
# सुरसुऱ्या, फुलभाज्या विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या. त्या इतरत्र टाकल्यास इतर कुणाचा पाय पडून भाजण्याची शक्यता असते. 

जर फटाके उडवतांना काही दुर्घटना घडलीच तर हे उपाय करा -

# दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा.
# भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.
# जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं.
# जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.

आणखी वाचा - दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.