मॅच फिक्सिंग : मॉडेल नुपूर मेहताची चौकशी - Marathi News 24taas.com

मॅच फिक्सिंग : मॉडेल नुपूर मेहताची चौकशी

www.24taas.com,मुंबई
 
मॉडेल नुपुर मेहताची मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीकडून चौकशी करण्यात आली. आयसीसीच्या अधिकारी पिकॉक यांनी तब्बल अडीच तास नुपूरची फिक्सिंगप्रकऱणी चौकशी केली.
 
2009 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कप  फिक्सिंगच्या आरोपांवरून  नुपुरची आयसीसीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान नुपूरनं आयसीसीनं आपलल्याला फिक्सिंगप्रकरणी क्लीन चीट दिल्याचा दावा केला आहे.
 
आयसीसीकडून नुपूरकडे लंकन प्लेअर्सबाबत चौकशी करण्यात आल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग  आता कोण अडकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Monday, June 11, 2012, 22:59


comments powered by Disqus