चव्हाणांसाठी 'चव्हाण'...

‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.

Updated: Jul 4, 2012, 06:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल १८ महिन्यांनी १० हजार पानांचे आरोपपत्र सेशन कोर्टाच्या रजिस्ट्रारसमोर ठेवण्यात आलं. याच आरोपपत्राबदद्ल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. काल दाखल केलेलं आरोपपत्र नवीन नाही, तसंच या प्रकरणात चौकशीचीही गरज नसल्याची धक्कादायक प्रतिक्रिया त्यांनी आज दिलीय.

याचबाबत आम्ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, 'आदर्श प्रकरणात माझा काहीएक संबंध नाही. जमीन वाटपातही माझा सहभाग नाही. हे माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र आहे आणि मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होतोय', अशी प्रतिक्रिया दिलीय.