राजनी सोडला नि:श्वास, शस्त्रक्रिया यशस्वी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

Updated: Jul 20, 2012, 02:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

अँजिओप्लास्टीसाठी उद्धव यांना सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे २ तास प्राथमिक चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. डॉ. सॅम्युएल मॅथ्यू उद्धव यांनी उद्धव यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. डॉ. मॅथ्यू यांनी याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही शस्त्रक्रिया केली होती. डॉ. मॅथ्यू यांच्या चमूमध्ये डॉ. जलील मेमन यांचाही समावेश होता.

उद्धव यांच्या शस्त्रक्रियेवेळी त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील लिलावतीत उपस्थित होते. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि  त्यांची आई देखील उपस्थित होती. दरम्यान, उद्धव यांच्या आरोग्यासाठी राज्यभरात शिवसैनिकांनी प्रार्थना सुरू केली होती. नागपूरमध्ये टेकडी गणपती मंदिरात पूजा करण्यात आली. तर औरंगाबादमध्येही महाआरती करण्यात आली.

[jwplayer mediaid="142942"]