'शॉर्टेस्ट वुमन' ज्योतीची जागतिक 'उंची'

नागपूरच्या ज्योती आमगेचं नाव ‘शॉर्टेस्ट वुमन ऑफ दि वर्ल्ड' म्हणून आज ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात येईल. आज मुंबईत होणाऱ्या एका परिषदेत तिला गिनेजच्या वतीने अधिकृतरीत्या प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

Updated: Dec 16, 2011, 03:36 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

नागपूरच्या ज्योती आमगेचं नाव ‘शॉर्टेस्ट वुमन ऑफ दि वर्ल्ड' म्हणून आज ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात येईल. आज मुंबईत होणाऱ्या एका परिषदेत तिला गिनेजच्या वतीने अधिकृतरीत्या प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. आजच ज्योतीचा अठरावा वाढदिवस असून, तिच्यासाठी हे सगळ्यात मोठी भेट ठरेल.

 

ज्योतीचा जन्म १६ डिसेंबर १९९३ साली झाला होता. आज १८ वर्षं वयाच्या ज्योतीची उंची फक्त एक फूट एवढी आहे. जवळपास सहा महिन्यांच्या बाळाइतका तिचा आकार आहे. याच कमी उंचीमुळे ज्योतीचं नाव ‘शॉर्टेस्ट वुमन ऑफ दि वर्ल्ड' म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

 

कमी उंचीमुळे ज्योतीला अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागतो. पण, तरीही ज्योती या गोष्टीचा बाऊ न करता जिद्दीने प्रगती करत आहे. शिक्षणाच्या बरोबरीनेच तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.