राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा तपशील जनतेला देणाऱ्या 'करुन दाखवलं' या जाहिरातींची होर्डिंग मुंबईत सर्वत्र लावली आहेत

Updated: Jan 6, 2012, 06:29 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचलं  आहे. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेल्या  विकास कामांचा तपशील जनतेला देणाऱ्या 'करुन दाखवलं' या  जाहिरातींची होर्डिंग मुंबईत सर्वत्र लावली आहेत. त्याचा  समाचार घेताना राज ठाकरे यांनी गुजरातमध्येही करून दाखवलं पण अशा  स्वरुपाचे एकही होर्डिंग माझ्या पाहण्यात आलं नाही, असा टोला लगावला आहे. राज ठाकरे  दादरच्या वनिता समाज इथे एका महत्वाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना राज ठाकरेंनी परत एकदा शिवसेनेला टार्गेट केल्याने आता रणधुमाळी  तोंड फुटलं आहे,  हे नक्की.

 

भाजप आता मनसेकडे शिवसेनेचा पर्यायी पक्ष म्हणून चाचपणी करीत असल्याचे  झी २४ तासचे गेस्ट एडिटर शरद पवार यांनी केलेल्या व्यक्त केले होते. त्या बद्दल राज ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, पवारांना अशा प्रकारचे राजकारण करण्याची जुनी सवय आहे. आता तरी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, असे स्पष्ट करत राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत एकला चालो रे ही आपली भूमिका कायम असल्याचा पुनरुच्चार  केला.

[jwplayer mediaid="24791"]