शुभेच्छा 'एसएमएस' लावणार खिशाला कात्री!

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे.

Updated: Oct 25, 2011, 07:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे. बहुतेक मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी २५,२६ ऑक्टोबर हे दिवस 'ब्लॅकआऊट डे' यादीत टाकल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.

 

एअरटेल, लूप, व्होडाफोन व टाटा डोकोमो यांनी२५ व २६ ऑक्टोपबर 'ब्लॅकआऊट' दिवसांच्या यादीत टाकले आहेत. आयडिया, युनिनॉर व रिलायन्स यांनी २६ ऑक्टोबर'ब्लॅकआऊट' दिवस जाहीर केला आहे.
हा 'ब्लॅकआऊट डे' मुंबई आणि महाराष्ट्र सर्कलमधील ग्राहकांना एसएमएससाठी तीन रुपयांहून अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय एसएमएस यांचे दर समान पातळीवर येतील. तर 'व्हॉईस कॉल'साठीही जादा पैसे आकारण्यात येणार आहेत.