राज्य कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता

केंद्र सरकारच्या धरतीवर आता राज्य सरकारने महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता वाढीव ७ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे कर्मचार्‍यांसाठई ही गुड न्यज आहे.

Updated: Apr 10, 2012, 08:36 AM IST

www.24taas.com, मुंबई

केंद्र सरकारच्या धरतीवर आता राज्य सरकारने महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता  वाढीव ७ टक्के  महागाई भत्ता  देण्याचा निर्णय शासनाने  घेतला. त्यामुळे  कर्मचार्‍यांसाठई ही गुड न्यज  आहे.

महागाई भत्तावाढीचा फायदा १८ लाख राज्य कर्मचारी, अधिकारी आणि ६ लाख सेवानवृत्तांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तीन महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकीही शासन आता द्यावी लागणार आहे. ही रक्कम शासन देईल, असा विश्‍वास महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत ५८ टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचार्‍यांना मिळत होता. आता तो ६५ टक्के होणार आहे. केंद्र सरकारने ही वाढ १ जानेवारी २0१२ पासून लागू केली असली तरी राज्याने मात्र ती एप्रिलपासून लागू करण्याचे ठरविले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमधील महागाई भत्ता वाढीबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे  राज्य शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.