लोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमी

लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

Updated: Apr 19, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, नाहूर

 

[caption id="attachment_85652" align="alignleft" width="300" caption="फोटो प्रातिनिधिक आहे"][/caption]

लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. ३ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

 

नाहूर आणि भांडूप स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. बदलापूरहून सीएसटीच्या दिशेने निघालेल्या गाडीतून १७ जण एकाचवेळी पडले. त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आलं आहे. इतर १५ जखमींपैकी चौघांना जखमींना राजावाडीत दाखल करण्यात आलं आहे.

 

रेल्वेच्या खोळंब्यामुळं आजही रेल्वे प्रवाशांचे हाल सुरुच आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळी तुफान गर्दी झाली होती. ठाणे स्टेशनवरुन सुटणाऱ्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळं प्रवाशांचे आणखीनच हाल झाले. कर्जत कसाऱ्याहून येणाऱ्या ट्रेनमध्ये तुफान गर्दी असल्यानं ठाणे स्टेशनमध्ये प्रवाशांना लोकलमध्ये चढणं कठीण होत होतं.

 

मध्य रेल्वेची कोलडमडलेली लोकल सेवा उद्यापर्यंत सुरळीत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केला आहे. आज ९० टक्के लोकल रुळावर असून अर्धा तास उशिराने धावत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.