ड्रायव्हिंग लायसन्सला घराबाहेरचा रस्ता

तुम्हाला आता यापुढे घराचा पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने तसा नियम आमलात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Updated: Nov 24, 2011, 04:22 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

 

तुम्हाला आता यापुढे घराचा पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने तसा नियम आमलात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं ड्रायव्हिंग लायसन्सला घराबाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न  झाला आहे.

 

 

ड्रायव्हिंग लायसन्स निवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरता येणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने  नवा अध्यादेश काढला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स फक्त वाहन चालवण्याचा परवाना म्हणून वापरण्यात येणार आहे. खोट्या पत्त्याच्या आधारे अनेकांनी  ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारने निवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स वापरता येणार नाही, असा निर्णय केला आहे.

 

 

दरम्यान,  आता ओळख दाखविण्यासाठी 'आधार कार्ड ' उपयोगात आणता येणार आहे. तसेच मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आता 'आधार कार्ड 'ही ग्राह्य मानले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू होईल. या अगोदर पासपोर्ट, पॅन कार्ड असे १६ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जात होते.आता यामध्ये आधार कार्डाचाही समावेश करण्यात आला आहे. तसा निर्णय निवडणूक आयोगाने  घेतला आहे.