भाजपची माघार ही भ्रष्टाचाराला पाठिंबा, मुंबईकरांना धोका : काँग्रेस

 भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणे आणि मुंबईकरांना धोका देणे, हीच भाजपची पारदर्शकता आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2017, 10:24 PM IST
भाजपची माघार ही भ्रष्टाचाराला पाठिंबा, मुंबईकरांना धोका : काँग्रेस title=

मुंबई :  भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणे आणि मुंबईकरांना धोका देणे, हीच भाजपची पारदर्शकता आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेसेना आणि भाजप एकमेकांविरुद्ध लढले, एकमेकांवर निवडणुकीत आरोप प्रत्यारोप केले. परंतु आता भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे मुंबईकरांना धोका दिला आहे. हीच काय भाजपची पारदर्शकता आहे, असा उपरोधीत सवाल उपस्थित केला.

भाजप नेहमी म्हणत आली आहे की, शिवसेना ही भ्रष्टाचार करणारी आणि हफ्ताखोर पार्टी आहे. मग शिवसेनेला त्यांनी महापौर पदासाठी समर्थन आणि पाठिंबा का दिला ? भाजपने मुंबईकरांना दिलेला हा खूप मोठा धोका आहे. मुंबईकरांची ही फसवणूक आहे. मुंबईकर शिवसेना आणि भाजपला कधीच माफ करणार नाहीत, असे संजय निरुपम म्हणाले.