मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी

मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो. 

Updated: Jan 31, 2017, 06:31 PM IST
मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी  title=

मुंबई : मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो. 

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, असा युक्तीवाद राज्य सरकारनं केला होता.  मराठा आरक्षण मुद्दयावर एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारनं मराठा आरक्षण देणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. शिवाय तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचं अडीच हजार पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात ७ डिसेंबरला सादर केलं होतं. पण प्रतिज्ञापत्र सादर करायला २० महिन्यांचा कालावधी का लागला आणि आणखी किती वेळ हवा असा खोचक प्रश्न करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं. 

यावेळी प्रतिज्ञापत्राची प्रत सर्व वादी आणि प्रतिवादींना द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. त्याचप्रमाणे याचिकेशी संबंधित सर्वांना प्रतिज्ञापत्राची प्रत मिळाल्यानंतर सर्वांनी आपलं म्हणणं ३० जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावं, असं कोर्टानं म्हटलं होतं. काल याप्रकरणी सर्वांनी आपलं म्हणणं मांडल्यावर आज कोर्टानं अंतिम तारीख निश्चित केली आहे.