चक्क सोने तस्करीला लगाम

सोन्याला जास्तच भाव आल्याने तस्करीमध्ये वाढ झाली होती. याला आता लगाम बसणार आहे. कस्टम विभागाने तस्करी रोखण्यासाठी बारीक नजर ठेवली आहे. त्यातच तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना जास्त लाभ होत नसल्याने त्यांचीही पाठ फिरु लागली आहे. 

Updated: Oct 22, 2014, 11:15 AM IST

मुंबई : सोन्याला जास्तच भाव आल्याने तस्करीमध्ये वाढ झाली होती. याला आता लगाम बसणार आहे. कस्टम विभागाने तस्करी रोखण्यासाठी बारीक नजर ठेवली आहे. त्यातच तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना जास्त लाभ होत नसल्याने त्यांचीही पाठ फिरु लागली आहे. 

गतवर्षी सोने आयात करात वाढ केल्यानंतर सोन्याची तस्करीही वाढली होती. मात्र कस्टम विभागाच्या सतर्कतेमुळे आता कुरिअर कंपन्यांसाठी सोन्याची ने-आण करणे धोकादायक ठरू लागलेय. त्याचवेळी अशा व्यवहारात गुंतलेल्या टोळ्यांचा नफाही कमी होऊ लागला आहे. याचाही परिणाम दिसून येत आहे.

चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी आघाडी सरकारने गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयात करात वाढ केली होती. त्याचा परिणाम  म्हणून देशातील सोन्याची आयात घटली होती. स्वाभाविकपणे याचा अर्थव्यवस्थेलाही लाभ झाला. मात्र आयात कर वाढीमुळे सोन्याच्या तस्करीत मोठया प्रमाणात वाढ झाली होती. त्याला लगाम बसण्याची मागणी होत होती.

सरकारी यंत्रणांकडून पकडले जाण्याचा धोका आता वाढल्याने कुरिअर कंपन्यांनी याचा धसका घेतला आहे. त्यामुळे आता सोन्याची ने-आण करण्याच्या दरात या कंपन्यांकडून वाढ झाली. गतवर्षी ज्या कुरीअर कंपन्या १० ग्रॅम सोन्यासाठी १५० रूपये आकारत होत्या त्यांच्याकडून आता २८७ रूपये आकारले जात आहेत. त्यामुळे तस्करीला काही प्रमाणात चाप बसण्यास मदत झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.