शिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत

शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे.  

Updated: Sep 16, 2014, 06:44 PM IST
शिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत title=

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे सांगितले. त्यानंतर  भाजप बॅकफुटवर आलेय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल होणार असून मुंबईतील भाजप नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपांसंबधी चर्चा करणार आहेत.

शिवसेना-भाजप युतीबाबत प्रचंड तणाव निर्माण झालाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला १३४ जागा न सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे. दरम्यान, भाजप नेते माधव भंडारी यांनी युतीबाबत बोलणी थांबली असल्याचे विधान केल्याने उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असल्याचे पाहायला मिळालेय. भंडारी यांना उद्धव ठाकरे यांनी आदरणीय नेते म्हणत चिमटाही काढला.

दरम्यान, पोट निवडणुकीत मोदी फॅक्टर अपयशी ठरल्याने भाजपच्या गोठात धास्तीही वाढलेय. तसेच भाजप-सेना युतीतील तणाव वाढल्याने केंद्रीय मंत्री  आणि भाजपनेते नितीन गडकरी यांच्या उपस्थित दिल्लीत प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा अपूर्णच राहीली. उद्या यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपाबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यातच उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील भाजप नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपांसंबधी चर्चा करणार आहेत. त्यामुळे युतीतील जागा वाटपाचा तिढा उद्या सुटतो का? याकडे लक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.