श्वेतपत्रिकेतून सत्य बाहेर येईल- अजित पवार

अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढायला माझी काहीही हरकत नाही. त्यामुळं सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वित्त विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले होते यावर अजित पवार यांनी हे मत व्यक्त केलंय. 

Updated: Nov 4, 2014, 01:34 PM IST
श्वेतपत्रिकेतून सत्य बाहेर येईल- अजित पवार  title=

मुंबई: अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढायला माझी काहीही हरकत नाही. त्यामुळं सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वित्त विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले होते यावर अजित पवार यांनी हे मत व्यक्त केलंय. 

सरकार भाजपचं आहे त्यांना सर्वाधिकार आहे. अर्थमंत्री व्यक्तीगत काम करत नसून मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या संमतीनं काम करतात. वित्तमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातच या विषयावर एकमत आहे का? असा खोचक सवाल ही त्यांनी उपस्थित केला. 

राष्टवादीनं यापूर्वीच राज्यातील भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना जरी भाजपसोबत गेली तरी आम्ही आमची भूमिका या आधीच स्पष्ट केली असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्वेतपत्रिका काढणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वेतपत्रिका काढल्यानं राज्याचं नाव खराब होतं, असं काल नागपूरात पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. त्यामुळं अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात एकमत आहे का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

पाहा काय म्हणालेत अजित पवार –

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.