२५० किलो वजन घटवणारी इमान आता अशी दिसते

Last Updated: Thursday, April 20, 2017 - 20:48
२५० किलो वजन घटवणारी इमान आता अशी दिसते

मुंबई : इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन २५० किलोनं कमी झालं. मुंबईत दाखल झाली तेव्हा 'जगातील सर्वात वजनदार महिला' म्हणून ओळख असलेल्या इमानचं वजन ५०० किलोंहून अधिक होतं.

वजन कमी झाल्यानंतरचे इमानचे काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. १८ एप्रिलला हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये इमान व्हील चेअरवरून हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसत आहे तर एका व्हिडिओमध्ये ती डॉक्टरांशी संवाद साधताना दिसत आहे.

डॉक्टर मुज्जफल लकडवाला यांनी ७ मार्च रोजी इमानवर शस्त्रक्रिया केली होती.इजिप्तची नागरिक असलेली इमान ३६ वर्षांची आहे. गेल्या २५ वर्षांपासून ती घराच्या बाहेरही निघाली नव्हती. पण, आता मात्र ती सामान्य आयुष्य जगू शकेल, अशी आशा निर्माण झालीय.

पाहा आता कशी दिसते इमान

First Published: Thursday, April 20, 2017 - 20:48
comments powered by Disqus