आज मिळणार राज्य महिला आयोगाला अध्यक्ष?

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर मंगळवारी संपणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 31, 2013, 11:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर मंगळवारी संपणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अॅड. विजया बागडे, सुशीबेन शहा आणि हुस्नबानू खलिसे यांची नावं चर्चेत आहेत.

२००९ पासून महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत तब्बल आयोगापुढे ४९ हजार प्रकरणं प्रलंबित आहेत. यासंदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. त्यानुसार आज अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता आहेत. अॅड. विजया बागडे, सुशीबेन शहा आणि हुस्नबानू खलिसे यांच्यापैकी कुणाची अध्यक्षपदी वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.