मुंबईत २४ तासांत दोन बलात्कार उघडकीस

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, September 12, 2013 - 13:09

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत चोवीस तासांत बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्यात. एका अल्पवयीन मुलीची अश्लील क्लीप बनवून तीच्यावर वारंवार बलात्कार झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं होतं. त्यानंतर आता एका गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याचं पुढे आलंय.
गतीमंद तरुणीवर बलात्कार
मुंबईतील ग्रँटरोड परिसरात एका ३२ वर्षीय गतीमंद तरुणीवर बलात्कार झालाय. ही तरुणी दुकानात खरेदीसाठी गेली असता एका अनोळखी व्यक्तीने तिला फसवून जवळच्या फिरसोद लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत प्रथम तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिल्याचं पीडित तरुणीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकरणात पोलिसांनी लॉजच्या मॅनेजरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

अश्लील क्लीप बनवून बलात्कार
वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. यातील एक तरुण हा पीडित मुलीचा प्रियकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
खार पूर्वेकडील निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणीवर तिचा प्रियकर आणि याच परिसरात राहणाऱ्या एका इसमाने बलात्कार केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
पीडित मुलीच्या मैत्रीणीने तिला दोन जुलै रोजी दुसरा आरोपी कुरेशी याच्या घरी नेले होते. त्यावेळी कुरेशीने थंड पेयामध्ये गुंगिचं औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. तसेच आपल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढून या प्रकरणाची वाच्यता केल्यास बदनामीची आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी विजयकुमार ब्रम्हदेव या आरोपीनं अश्लील क्लिप बनवली आणि त्याआधारे धमकी देत तीच्यावर वेळोळी अत्याचार केले, असंही या मुलीनं आपल्या तक्रारीत नमूद केलंय. या मुलीचे विजयकुमारशी प्रेमसंबंध होते.

याप्रकरणी कुरेशी आणि विजयकुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांना १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच पीडित मुलिला अख्तरकडे नेणाऱ्या अल्पवयीन मुलीलाही अटक करण्यात आली असून तिची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013 - 13:06
comments powered by Disqus