उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या

मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 08:10 PM IST
 उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 

या कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात करताना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर मिश्किल टीका करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करत महापौर आपलाच असेल असंही सांगितलं. 

तर प्रबोधनकारांचं तैलचित्र लावायला थोडा उशीरच झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला.