आरोपींची जाहीर धिंड काढा – उद्धव ठाकरे

By Aparna Deshpande | Last Updated: Friday, August 23, 2013 - 20:55

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा सामूहिक बलात्कारासारख्या घटना पुरावा आहे. आरोपींवर कारवाई करण्याआधी त्यांची जाहीर धिंड काढावी तरच जरब बसेल असे रोखठोक मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मात्र असं असलं तरी ही वेळ राजकीय चर्चेची किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही... पोलिसांनी तपासकार्यामध्ये सहकार्य करावं आणि आरोपींनाही पकडावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
छायाचित्रकार तरुणीवर झालेला बलात्कार ही अत्यंत घृणास्पद घटना आहे.
बलात्काराच्या घटनेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे कठोर शब्दांत निषेध करत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर तोफ डागली. त्यापोठापाठ उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध केला. घटनेवर बोलताना ही राजकारण करण्याची वेळ नाही, असा टोला मात्र त्यांनी राज यांचा उल्लेख न करता लगावला.
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खदायक आहे, असे नमूद करतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघालेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, August 23, 2013 - 20:55
comments powered by Disqus