उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, November 6, 2012 - 13:20

www.24taas.com, मुंबई
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून ते मोतोश्रीवर पोहचले आहेत.
रविवारी उद्धव यांच्यावर दुसरी यशस्वी एँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर दोन दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांतीसाठी रुग्णालयात होते. एँजिओप्लास्टीनंतर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांची भेटून आणि फोनवरुन तब्येतीची विचारपूस केली.
पहिल्या एँजिओप्लास्टीवेळी राजकीय मतभेद विसरुन सोबत राहिलेले त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे याहीवेळी उद्धव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.. एँजिओप्लास्टीवेळी आणि सोमवारी त्यांनी लीलावतीमध्ये उद्धव यांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

First Published: Tuesday, November 6, 2012 - 13:16
comments powered by Disqus