`थीम पार्क`संदर्भात उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, June 2, 2013 - 18:04

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. शिवसेनेनं महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा गंभीरतेनं घेतला असून याच मुद्यावर उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
थीम पार्क उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांच्या सूचनेनंतरच हे थीम पार्क उभारण्यात यावं असं उद्धव यांनी यावेळी सांगितलं. महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी काल रेसकोर्सची पहाणी केली होती.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रेसकोर्सवर थीम पार्क व्हावं यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी सत्ताधा-यांना सहकार्याचं आवाहनही केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013 - 18:04
comments powered by Disqus