उद्धव ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, March 10, 2013 - 22:53

www.24taas.com, मुंबई
आपलं दादर कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.. यावेळी उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं नातं उलगडलं... बाळासाहेबांची सभा पवारांनी कट्ट्यावर बसून ऐकल्याची आठवण सांगत असताना त्यांच्या राजकीय पॉवरगेमवर उद्धव यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली...
आपल्या योजना चांगल्या असूनही जर शासनाने आडकाठी केली, तर त्यावर काही करू शकत नाही. असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या गप्पांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना आपली मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात याचा अभिमान वाटेल असा विकास करण्याचं अश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

First Published: Sunday, March 10, 2013 - 22:53
comments powered by Disqus