नारायण राणेंवर उद्धव ठाकरेंचा प्रहार

Last Updated: Wednesday, January 30, 2013 - 16:58

www.24taas.com, मुंबई
एकेकाळचे शिवसैनिक नारायण राणे यांचाही उल्लेख या मुलाखतीत झाला... नारायण राणे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला. ‘नारायण राण्यांसारखे काँग्रेसचे नेते म्हणतात की, शिवसेनेला आता भवितव्य नाही.’ या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी अगदी रोखठोक उत्तर दिलं आहे.
‘स्वत:च्या भवितव्याचा विचार त्यांनी आधी करावा. कशासाठी आपण शिवसेना सोडली? आणि का म्हणून काँग्रेसमध्ये गेलो? आणि आज कितव्या नंबरवर पाणी भरतो आहोत? तो त्यांनी विचार करावा. शिवसेनेची चिंता करू नये. अशाप्रकारे नारायण राणेंना टार्गेट करीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर चांगलाच प्रहार केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामना यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत बरीच गाजते आहे. मग ती चर्चा राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत असो, किंवा त्यांच्या पी. ए. बाबत केलेलं वक्तव्य असो. अनेक विषयावर उद्धव ठाकरेंनी सडेतोड अशी उत्तरे दिली आहेत. अशाच एका प्रश्नावर त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणेंचाही समाचार घेतला आहे.

First Published: Wednesday, January 30, 2013 - 16:50
comments powered by Disqus