...तर पोलीस खातं हवंच कशाला?- उद्धव ठाकरे

गणेश मंडळांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी टाकणार असाल तर पोलीस खातं हवंच कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल सिंग यांना विचारलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 8, 2013, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
गणेश मंडळांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी टाकणार असाल तर पोलीस खातं हवंच कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल सिंग यांना विचारलाय. भाविक महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी गणेश मंडळांवर टाकल्याचा उद्धव ठाकरेंनी निषेध केला.
‘डॉ. सत्यपाल सिंग यांचं फर्मान तुघलकी आहे. मुसलमानांच्याबाबत असे फतवे पोलीस काढतील का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. गणेशोत्सवाआधीच या पोलीस आयुक्तांचं विसर्जन करा’ अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणा-या भाविक महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही गणेश मंडळांचीच असेल असं मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. काही अनुचित प्रकार या वेळी घडला तर गणेशोत्सव मंडळाची परवानगी काढून घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.