ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा- उद्धव ठाकरे

Last Updated: Thursday, January 24, 2013 - 14:55

www.24taas.com, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल पक्षप्रमुखपदी निवड होताच उद्धव ठाकरे यांनी काल नाराजांना सुनावले. जे नाराज असतील त्यांनी आपली नाराजी माझ्यापर्यंत पोहोचवावी आणि ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी आताच जावे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पदाधिका-याना सुनावल्याचे समजते.
शिवसेना भवनात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली. या वेळी ते म्हणाले, पक्षात लोकशाही असली तरी मी फालतू लोकशाही खपवून घेणार नाही. पक्षात काही लोकांची नाराजी आहे. माझ्यापर्यंत ही माहिती येते. त्यांनी थेट माझ्याशी बोलावे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्ष संपेल असे म्हणणा-या ना सुनावताना त्यांनी काँग्रेसची स्थापना करणा-या ह्यूम यांचे निधन झाले; पण काँग्रेस संपली काय, असा सवाल केला.

First Published: Thursday, January 24, 2013 - 14:38
comments powered by Disqus