शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे होणार स्थानापन्न!

अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या निवड केली जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 10, 2013, 09:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या निवड केली जाणार आहे.
येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेना भवनात पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंच्या नावाचा ठराव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव निवडणूक आयोगालाही पाठवण्यात येणार आहे तसंच यावेळी शिवसेनेत काही संघटनात्मक बदल केले जाण्याचीही शक्यता आहे. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या बदलावेळी करण्यात येतील.
उद्धव ठाकरे येत्या ३ फेब्रुवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळी भागातून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून पहिली सभा मराठवाड्याच्या जालन्यात होणार आहे. या दौऱ्याची रुपरेषा ठरवण्याचं काम सध्या पक्षात सुरु आहे.