राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लक्षवेधीला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीयय

Updated: Apr 1, 2015, 04:33 PM IST
राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार - मुख्यमंत्री  title=

मुंबई: पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लक्षवेधीला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीयय

सीताराम कुंटे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला असून पिंपरी चिंचवडमधील ६५,३२० बांधकामं अनधिकृत असल्याचं कळतंय. पिंपरी चिंचवडमधील ७० ते ७५ टक्के बांधकामं नियमित करण्यासारखी असल्याचं या अहवालात आहे.  

अहवालाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच मुंबई उच्च न्यायालयालाही अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याबाबत सरकार विनंती करणार असल्याचं ते म्हणाले. 

दरम्यान, कोणती बांधकामं अधिकृत करता येतील याचा सर्व्हे करण्यासाठी कोर्टानं वेळ द्यावा, अशी विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.