`उगाचच चर्चा नको, फक्त सदिच्छा भेट`

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची दखल घेतली. गेल्या काही दिवसांत विशालयुती आणि टाळीची चर्चा रंगत असल्यामुळे ही भेटही लाईमलाईटमध्ये आली होती.

Updated: Jun 5, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची दखल घेतली. गेल्या काही दिवसांत विशालयुती आणि टाळीची चर्चा रंगत असल्यामुळे ही भेटही लाईमलाईटमध्ये आली होती. मात्र या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ही केवळ सदिच्छा भेट होती, असा त्यांचा दावा आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर गेले होते. देवेंद्र फडणवीस राज यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय क्षेत्रात चर्चांना मात्र चांगलचं उधाण आलं आहे.
कृष्णकुंजवर दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ दीड तास चर्चा झाल्याचे समजते. दिल्लीच्या धरतीवर महाराष्ट्रात लोकशाही आघाडी स्थापन करण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला फडवणीस गेल्याचे समजते. राज ठाकरे आता कोणाला टाळी देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना मात्र वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. आता विशाल महायुतीच्या चर्चांनाही ऊत येणार हे निश्चित...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.