मुंबईत २०१२ साली येथे सर्वात कमी मतदान झाले होते

उच्चशिक्षित आणि उच्च-भ्रू मतदार अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान हे मोठ्या संख्येने होणं अपेक्षित असतं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2017, 10:55 PM IST
मुंबईत २०१२ साली येथे सर्वात कमी मतदान झाले होते title=

मुंबई : उच्चशिक्षित आणि उच्च-भ्रू मतदार अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान हे मोठ्या संख्येने होणं अपेक्षित असतं. मात्र याच ठिकाणी कमी मतदान होत असल्याचं समोर आलं आहे. 2012 साली कुलाब्यातील कफ परेड भागात अवघं 23.47 टक्के मतदान झालं होतं. 

मंगळवारी होणाऱ्या मतदानात हाच टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु आहे. विविध प्रकारे मतदानाला बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. झी मीडियासुद्धा या भागातील मतदारांना मोठ्या संख्येनं बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करीत आहे.