अभिनेते दिलीपकुमार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रविवारी संध्याकाळी वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Aparna Deshpande | Updated: Sep 16, 2013, 09:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रविवारी संध्याकाळी वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दिलीपकुमार यांच्या छातीत दुखत असल्यामुळं त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टनरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्यासाठी ते रुग्णालयात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.