VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं?

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत. 

Updated: Dec 26, 2015, 02:43 PM IST
VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं? title=

मुंबई : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत. 

फरहान आझमी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत फरहान एका महिला डॉक्टरशी हुज्जत घालताना दिसत आहेत. 

एका बाजुला, वांद्र्याच्या भाभा हॉस्पीटलमध्ये हॉस्पीटलमध्ये घुसून ऑन ड्युटी महिला डॉक्टरला धवकावण्याचा प्रयत्न फरहान आझमी यांनी केला, असा आरोप करून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलला जातोय. 

तर दुसऱ्या बाजुने एका पेशंटला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करून घेण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याशी या पद्धतीनं बोलावं लागलं, असा युक्तीवाद केला जातोय. 

व्हिडिओ पाहा :-