आम्ही आरोपांचे खंडन करतो : मुनगंटीवार, तावडे, पाटील

आम्ही राज्य सरकार म्हणून आम्ही आरोपांचे खंडन करत आहे, सरकारच्या विरोधात आरोपांची शृंखला सुरु केली गेली आहे. जाणीवपूर्वक राईचा पर्वत केला जात आहे, असे सांगत प्रसार माध्यमे पण अशा बातम्या लावत उगाचच दोन - तीन दिवस वाया घालवत आहेत, असे खापर मीडियावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडले.

Updated: Jul 1, 2015, 02:44 PM IST
 आम्ही आरोपांचे खंडन करतो : मुनगंटीवार, तावडे, पाटील title=

मुंबई : आम्ही राज्य सरकार म्हणून आम्ही आरोपांचे खंडन करत आहे, सरकारच्या विरोधात आरोपांची शृंखला सुरु केली गेली आहे. जाणीवपूर्वक राईचा पर्वत केला जात आहे, असे सांगत प्रसार माध्यमे पण अशा बातम्या लावत उगाचच दोन - तीन दिवस वाया घालवत आहेत, असे खापर मीडियावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडले.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या खात्यातील १९१ कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमतता आढळल्याने पुन्हा एकदा घोटाळ्याचा आरोप करण्यात येत होता. तसेच शाळा अग्निशामक साधन खरेदी वादात, असाही आरोप होत असल्याने याबाबात  भाजपच्यावतीने सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

गेली १५ वर्षे जशी खरेदी व्हायची तशी होऊ नये म्हणून आम्ही काळजी करतो, शिक्षण मंत्र्यांनी ती फाईल परत पाठवलेली नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तर तावडे म्हणालेत, शिक्षण खात्याने वित्त खात्याने संगितल्यावर फाईल थांबवली, एका पैशाचा पण घोटाला झालेला नाही. आम्ही ती फाईल बंद केली आणि चौकशीचे आदेशही दिलेत.
 
काँग्रेसच्या काळात २७ हजार शाळा अग्निशामक साधन दिली. रेट कंत्राटदारपद्धीतीने दिली. अजून काही शाळा बाक़ी होत्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेश आहे, म्हणून अग्निशामक साधन खरेदी केली. मात्र एकही पैसा दिलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. आमच्याविरोधात तथ्यहीन बातमी पेरल्या जात आहेत, ते म्हणालेत.

दरम्यान, यापुढे मंत्रिमंडळचे निर्णय सांगण्यासाठी सुधीर मुनगंटीवार प्रवक्ते म्हणून संवाद साधतील, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेतील मुद्दे
- प्रत्येक गोष्टीत ई टेंडरिंग शक्य नसते म्हणून रेट कॉन्ट्रेक्ट दिला जातो, ही पद्धत १९९० पासून सुरु आहे - सुधीर मुनगंटीवार
- सर्व शाळांमध्ये अग्निरोधक यंत्र लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, आम्ही कंत्राट दिले नाही तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन ठरले असते - सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
- अर्थखात्याला विविध खात्यांकडून प्रस्ताव जात असतात. या प्रस्तावांवर वित्तविभागाकडून नेहमीच प्रश्न विचारले जातात, हा प्रशासकीय कामकाजाचा भाग असतो - तावडे
- राज्य सरकारी तिजोरीतून कंत्राटदाराला एक रुपयाही दिला गेलेला नाही - विनोद तावडे
अर्थमंत्रालयाने प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा तो प्रस्ताव पाठवलेला नाही - मुनगंटीवार
- ज्या गोष्टीची खरेदीच झाले नाही, त्याच कौतुक करण्याऐवजी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला - मुनगंटीवार
भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप केले जात आहेत - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.