...आणि पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरुढ झाल्या!

भाजप खासदार आणि महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदावर आरुढ होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही... आता तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचं समजतंय.

Updated: Feb 12, 2016, 05:34 PM IST
...आणि पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरुढ झाल्या! title=

मुंबई : भाजप खासदार आणि महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदावर आरुढ होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही... आता तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचं समजतंय.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आपण असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या पंकजांनी नुकतीच जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एक बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. 

एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीसाठी मंत्रालयातील समिती कक्षात सगळे जण जमले होते. त्यावेळी, पंकजा ज्या खुर्चीत बसल्या त्या खुर्चीमागे 'मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन' असं लिहिलं होतं... 

यामुळे हा निव्वळ योगायोग की भविष्य? अशी चर्चा मंत्रालयात सुरू झालीय.