'सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही'

सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तसंच याचवेळी राऊतांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचाही खरपूस समाचार घेतलाय. सत्तेसाठी राणेंनी पक्षश्रेष्ठींची लाचारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. 

Updated: Nov 6, 2014, 02:46 PM IST
'सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही' title=

रत्नागिरी : सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तसंच याचवेळी राऊतांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचाही खरपूस समाचार घेतलाय. सत्तेसाठी राणेंनी पक्षश्रेष्ठींची लाचारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. 

दरम्यान, कुठल्या क्षणी निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे. शिवसेना-भाजपमधला तिढा एकीकडे वाढलेला असतानाच, आता कुठल्याही क्षणी निर्णय होईल, असे संकेत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. आता खूप दिवस झाले, चर्चा थांबली पाहिजे, निर्णयाचा क्षण जवळ आल्याचं ते म्हणालेत. 

तर दुसरीकडे शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आणखी वाढलाय. कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.योग्य स्तरावर बोलणी सुरू आहेत, याची दिल्लीहून घोषणा लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. पण शिवसेना मात्र आधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव व्हावा, यावर ठाम आहे. तर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मग विश्वासदर्शक ठराव करण्यावर शिवसेनाही आग्रही असल्यामुळं हा तिढा वाढण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.