कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय. 

Updated: Aug 19, 2015, 03:17 PM IST
कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध? title=

मुंबई : वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय. 

हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी राधे माँ ही बुधवारी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. या प्रकरणात पोलिसांनी तिची पुन्हा चौकशी केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राधे माँची तब्बल २५ मिनिटं चौकशी केली यात त्यांनी तब्बल २३ प्रश्नांचा भडिमार तिच्यावर केला. यावेळी, वारंवार 'डॅडी' नावाच्या व्यक्तीची उल्लेख होता.

पोलिसांनी 'डॅडी' नावानं अनेकांना परिचित असणाऱ्या व्यक्तीबद्दल राधे माँला अनेक प्रश्न विचारले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॅडी आणखी कुणी नाही तर राधे माँचा पती आहे. 

यावेळी, राधे माँला पोलिसांनी संपत्तीबद्दलही विचारणा केली. यावर, आपल्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नसल्याचं राधे माँचं म्हणणं होतं. पोलिसांनी तिच्याकडे पासपोर्टबद्दलही विचारणा केली... त्याचे तपशील मात्र तिनं अजूनही दिलेले नाहीत. 

यावेळी, आपल्यावरचे सर्व आरोप राधे माँनं फेटाळलेत. आपण कुणालाही हुंड्यासाठी भडकावलं नाही किंवा कुणाकडूनही पैसे घेतले नाही.... ना कॉस्मेटिक सामान घेतलंय, असं राधे माँनं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.