हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख होणार तरी कोण?

हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.

Updated: Dec 1, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे. शिवसेना या संघटनेचं आता स्वरूप फारच मोठं झालं आहे. आणि त्यामुळेच बाळासाहेबांच्या निधनानंतर आता यापुढे पुढील शिवसेनाप्रमुख कोण होणार याबाबत चर्चा झडू लागल्या. मात्र याचं उत्तर तरी अजून कोणालाच मिळालेलं नाहीये. म्हणूनच या प्रश्नावर स्वत: उद्धव ठाकरे उद्या खास मुलाखत देणार आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक `सामना`तून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत उद्या (रविवारी) प्रसिद्ध होणार आहे. त्यात `पुढले शिवसेनाप्रमुख कोण?` या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे एकच शिवसेनाप्रमुख होते, आहेत आणि राहतील अशी घोषणा खुद्द उद्धव यांच्या मुलाखतीतून होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिवसेनाप्रमुख हे पद कोणालाही देण्यात येणार नसून, उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना कार्यप्रमुख/कार्यकारी अध्यक्ष हे पद कायम राहील, असे बोलले जात आहे.