थीमपार्कला नाव बाळासाहेबांचं की बाबासाहेबांचं?

महालक्ष्मीच्या रेसकोर्सच्या जागेवरून राजकारण तापलं असतांना, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. रेसकोर्स नवी मुंबईत हलवा, त्याचा करार वाढवू नका, असं आठवले यांनी म्हटलंय.

जयवंत पाटील | Updated: May 15, 2013, 05:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महालक्ष्मीच्या रेसकोर्सच्या जागेवरून राजकारण तापलं असतांना, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. रेसकोर्स नवी मुंबईत हलवा, त्याचा करार वाढवू नका, असं आठवले यांनी म्हटलंय.
रेसकोर्सच्या जागेवर थीमपार्क झालं पाहिजे अशी मागणीही आठवलेंनी केली आहे. नाव कोणाचं द्यायचं यावरून वाद नको, बाळासाहेबांचं नाव दिलं तर त्याचं स्वागतच केलं जाईल, परंतु बाबासाहेबांचं नाव देण्याचा प्रश्न आला तर पहिलं प्राधान्य बाबासाहेबांच्या नावाला दिलं जाईल, असं आठवले यांनी म्हटलंय.
रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनेने व्यक्त केलंय. स्मारकाला विरोध करणारे आणि त्यावरुन वाद करणारे करंटे असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.