उद्धव ठाकरेंचा तो ‘पोटव्हिलन’ कोण?

‘महाराष्ट्रातल्या व्हिलनचा बंदोबस्त करणार आहोत… महाराष्ट्रात एक व्हिलन आहे आणि एक पोटव्हिलन आहे’ असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय.

Updated: Jun 28, 2014, 02:09 PM IST
उद्धव ठाकरेंचा तो ‘पोटव्हिलन’ कोण? title=

मुंबई : ‘महाराष्ट्रातल्या व्हिलनचा बंदोबस्त करणार आहोत… महाराष्ट्रात एक व्हिलन आहे आणि एक पोटव्हिलन आहे’ असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय.

हिंदमाता थिएटरचं रिनोव्हेशन झाल्यानंतर शुक्रवारी या थिएटरचं पुन्हा उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. पण उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामधला हा ‘पोटव्हिलन’ कोण? उद्धव ठाकरेंचा नेमका रोख कुणावर आहे? याची चर्चा आता सुरू झालीय.

उदघाटनानंतर शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'एक व्हिलन' या हिंदी चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी राजकीय टोलेबाजीही केली. चित्रपटाच्या नावाचा धागा पकडत उद्धव यांनी केलेल्या टोलेबाजीला प्रेक्षकांकडूनही दाद मिळाली.

पाहुयात, नेमकं काय म्हटलं उद्धव ठाकरेंनी... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.