आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा

पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

Updated: Aug 16, 2016, 02:28 PM IST
आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा title=

मुंबई : पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

500 चित्रपट, 2000 हिंदी, इंग्रजी आणि मराठी गाणी अशी मेजवानी प्रवाशांना मिळणार आहे. तर प्रत्येक महिन्यात चित्रपट आणि गाणी अपग्रेड केली जाणार आहेत. प्रत्येक वाय-फायचा पासवर्ड सारखाच असणार आहे. राज्यातल्या जवळपास 18000 एसटी बसमध्ये हि सुविधा येत्या दोन-तीन महिन्यात राबवली जाणार आहे.